आनंदीबाई रावराणे स्मृतिदिनानिमित्त ८ डिसेंबर रोजी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन.!

वैभववाडी :   आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्यावतीने कनिष्ठ महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये खेळा विषयी आवड व त्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयातील जिमखाना विभागाने केले आहे.
सदर स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन मुले व मुली अशा दोन गटात होणार आहे. सदर स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रु. ३०००/-, रु. २०००/- व रु.१०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. सदर स्पर्धा रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ठिक १०.०० वा. महाविद्यालयाच्या शहीद मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृह या ठिकाणी होणार आहेत.
सदर स्पर्धेमध्ये सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी व जिमखाना विभाग प्रमुख प्रा.एस.बी.पाटील यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी प्रा.एस. बी.पाटील (9503809192) व डॉ.के. पी.पाटील (7588576970) यांच्याशी संपर्क साधावा.

.ADVT –  

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles