Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

मध्य प्रदेशसमोर तगड्या मुंबईचं आव्हान.! ; महाअंतिम सामन्यात कोण जिंकणार?

बंगळुरु : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील विजेता संघ अवघ्या काही तासांनी निश्चित होणार आहे.या स्पर्धेतील महाअंतिम सामना हा रविवारी 15 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 4 वाजता टॉस होईल. सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल. तर टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्क वरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. श्रेयस अय्यर मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार याच्याकडे मध्य प्रदेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.

मध्य प्रदेशसमोर मुंबईला रोखण्याचं आव्हान –

या अंतिम सामन्यात मुंबईचं पार जड आहे. मुंबईच्या संघात एकसेएक आणि तोडीसतोड फलंदाज आहेत. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दूल ठाकुर, सूर्यांश शेडगे यांच्यासारखे तोडफोड फलंदाज आहेत. अजिंक्य रहाने या या हंगामातील 7 सामन्यांमध्ये 432 धावा केल्या आहेत. तसेच इतर फलंदाजांनीही तडाखेदार खेळी केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशला हा सामना जिंकायचा असेल तर मुंबईच्या फलंदाजांना रोखावं लागणार आहे.

मुंबईला दुसऱ्यांदा सय्यद मु्श्ताक अली ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. मुंबईने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात 2022-23 साली हिमाचल प्रदेशला अंतिम सामन्यात पराभूत करत ट्रॉफी उंचावली होती. त्यामुळे आता मुंबईकडे 1 वर्षांनंतर ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. तर मध्य प्रदेशला पहिल्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आता या प्रयत्नात कोण यशस्वी ठरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

अय्यर विरुद्ध अय्यर –

दरम्यान या अंतिम सामन्यात सर्वांचं श्रेयस अय्यर विरुद्ध वेंकटेश अय्यर यांच्या कामगिरीकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे. श्रेयस आयपीएलच्या इतिहासातील दुसरा तर वंकटेश तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. नुक्त्याच पार पडलेल्या आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये यो दोघांसाठी फ्रँचायजींनी मोठी बोली लावली. श्रेयससाठी पंजाब किंग्सने 26 कोटी 75 लाख रुपये मोजले. तर केकेआरने वेंकटेश अय्यरला 23 कोटी 75 लाख रुपयांमध्ये घेतलं. त्यामुळे हे महागडे खेळाडू या महाअंतिम सामन्यात कशी कामगिरी करतात? याकडे दोन्ही फ्रँचायजींचं लक्ष असणार आहे.

मुंबई टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटियन, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलानी, सिद्धेश गोयल, रॉयल गोयल, जयेश लाडके बिस्ता, साईराज पाटील, आकाश आनंद, अंगकृष्ण रघुवंशी, हिमांशू सिंग आणि एम जुनेद खान.

मध्यप्रदेश टीम : रजत पाटीदार (कर्णधार), अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सुभ्रांशु सेनापती, व्यंकटेश अय्यर, त्रिपुरेश सिंग, हरप्रीतसिंग भाटिया, राहुल बाथम, कुमार कार्तिकेय, आवेश खान, शिवम शुक्ला, कमल त्रिपाठी, कुलवंत खेजरोलिया, अरनिकेत खान, ए विकास शर्मा, पंकज चोथमल शर्मा आणि अभिषेक पाठक.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles