मळगा : श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचे वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन आज शनिवार दिनांक २८ रोजी आयोजीत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या रंगपटाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक चे अध्यक्ष श्री.मनिष दळवी उपस्थित रहाणार असून मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे चे श्री. विष्णू जयराम पेडणेकर यांच्यासह श्री. प्रतापराव कृष्णराव देसाई, (मुख्याध्यापक), श्री. दयानंद नारायण बांगर (पर्यवेक्षक), सांस्कृतिक विभागप्रमुख श्री. प्रसाद बापू आडेलकर यांच्यासह कु. चेतश्री नंदकिशोर बुगडे, कु. कुंदा दिनकर वारंग, कु.आयुष अमोल मांजरेकर (शालेय मंत्री), विदयार्थिनी प्रतिनीधी, श्री जनता विदयालय व कनिष्ठ महाविदयालय, तळवडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विदयार्थी, विद्यार्थिनी उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले.
तळवडे येथील जनता विद्यालयाचे आज वार्षिक स्नेहसंमेलन.
0
45