Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

कार्यकर्त्यांवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही! : वैभव नाईक, संघर्ष करणे शिवसेनेला नवीन नाही : परशुराम उपरकर.! ; येणाऱ्या काळात विजय मिळविण्यासाठी मेहनत घ्या! : राजन तेली, उबाठा शिवसेनेच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न.

सावंतवाडी : एका पराभवाने कुणाचे अस्तित्व संपत नाही, किंवा विचारधारा संपत नाही, विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी शिवसेना हिंदुत्व सोडणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जोमाने काम करून विजय संपादन करू त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास आम्ही तो सहन करणार नाही पूर्ण ताकदीनिशी कार्यकत्यांच्या पाठीशी उभे राहू असा विश्वास, माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

माजी आमदार परशुराम उपरकर,माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक गुरुवारी संपन्न झाली. यावेळी पदाधिकारी, शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिवसेना हा जनतेसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून फार कमी कालावधीत शिवसेना पक्ष सत्तेत होता. विरोधी पक्षात राहून संघर्ष करणे शिवसेनेला नवीन नाही त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. प्रसंगी संघर्ष केला पाहिजे. त्या संघर्षात आम्ही सर्व सोबत असू असे प्रतिपादन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले.

माजी आमदार राजन तेली म्हणाले, सत्तेचे काल चक्र फिरत असते आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्या ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे.आत्मपरीक्षण केले पाहिजे. पराभवाने खचून न जाता येणाऱ्या काळात विजय मिळविण्यासाठी एकजुटीने मेहनत घेतली पाहिजे असे सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनीही शिवसेना संघटना वाढीबाबत पदाधिकारी, शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सावंतवाडी येथे महिला जिल्हा संघटक श्रेया परब, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी महिला विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, महिला तालुकाप्रमुख नम्रता झारापकर,भारती कासार, शब्बीर मणियार, रमेश गावकर, सुनील गावडे, उपतालुकाप्रमुख राजेश शेटकर, गोविंद केरकर, महिला शहरप्रमुख श्रुतिका दळवी, फिलिप्स रॉड्रिक्स यासंह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक.
दोडामार्ग येथे तालुकाप्रमुख संजय गवस, लक्ष्मण आयनोडकर,तालुका संघटक विजय जाधव, जिल्हा बँक संचालक गणपत देसाई,शहर प्रमुख दिवाकर गवस, मदन राणे, संदेश राणे, गणेश धुरी,प्रदीप सावंत आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक.
वेंगुर्ले येथे तालुकाप्रमुख बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ,तुषार सापळे,उमेश नाईक,तुकाराम परब,वसंत साटम, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट,शैलेश परुळेकर, संदीप पेडणेकर,सुजित चमणकर,अजय सारंग,योगेश शेटये,निलेश परुळेकर,अभि मांजरेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles