सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन चिमूर (जिल्हा – चंद्रपूर) येथे १९ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार असून या अधिवेशनास नवनियुक्त शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राज्य शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी दिली.
नुकतीच शिक्षण मंत्री श्री. भुसे यांना निमंत्रण दिले असून याप्रसंगी शिवाजी खांडेकर, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विनोद गोरे, कार्याध्यक्ष प्रसन्न कोतुळकर हे देखील उपस्थित होते. शासनाने देखील या अधिवेशनास मंजुरी पत्र दिले असून संपूर्ण राज्यभरातून या अधिवेशनास ४ ते ५ हजार शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित राहतील अशी अपेक्षा शिवाजी खांडेकर यांनी व्यक्त केली. माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले असून उर्वरित प्रलंबित प्रश्न देखील लवकरात लवकर महामंडळाच्या माध्यमातून सोडविण्यात येतील अशी अपेक्षा खांडेकर यांनी व्यक्त केली. तरी या अधिवेशनास जास्तीत जास्त शिक्षकेतर बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजी खांडेकर यांनी केले.
ADVT –