Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी संतोष देशमुख यांच्या भावाचा ‘हा’ मोठा निर्णय.!

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु त्यांनी मंगळवारी ही याचिका मागे घेतली आहे. धनंजय देशमुख आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीपूर्वी त्यांनी याचिका मागे घेतली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात टाकलेली याचिका मागे घेतली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी याचिकेत केली होती.

याचिका मागे का घेतली..?

सध्या सुरू असलेल्या तपासावर बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त करत याचिका मागे घेतली. धनंजय देशमुख यांनी त्यांच्या वकिलामार्फत ही याचिका मागे घेतल्याची माहिती दिली. वकील शोमित साळुंखे यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, धनंजय देशमुख मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. आमदार सुरेश धस यांनी ही भेट घडवून आणली आहे. या भेटीपूर्वी धनंजय देशमुख यांची उच्च न्यायालयात दाखल याचिका मागे घेतली आहे.

संतोष देशमुख मुंबईसाठी रवाना –

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 30 दिवस पूर्ण झालेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. मुंबईत देशमुख कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अहिल्यानगरहुन देशमुख कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, आज मुख्यमंत्री यांना काही गोष्टी बोलायच्या आहे, त्या मी नंतर मी माध्यमांशी बोलणार आहे.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी संतोष देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याबाबत सांगितले की, देशमुख यांच्या कुटुंबियांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे जावे लागणे हे दुर्दैव आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles