Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

‘एसपीके’ त मिळणार रोजगाराभिमुख आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे – युवराज लखमराजे भोंसले यांचा अभिनव प्रयत्न.

सावंतवाडी : आज आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. रोजगाराभिमुख शिक्षणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विविध कोर्सेस उपलब्ध करणे काळाची गरज आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ यासाठी कटिबद्ध असून आगामी काळात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगार निर्मिती कशी होणार, कमीत कमी वेळ आणि खर्चामध्ये त्यांना चांगला रोजगार आणि जीवनशैली उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. म्हणूनच या वर्षापासून श्री पंचम खेमराज महाविद्यालयांमध्ये रोजगाराभिमुख आणि तंत्रज्ञान युक्त अभ्यासक्रमांची सोय करण्यात आली असल्याचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी सांगितले.

आज ‘एसपीके’ महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत युवराज लखमराजे भोंसले यांनी ही माहिती दिली. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले, संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमंत सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त लखमसावंत भोंसले, सौ. श्रद्धाराजे भोंसले, तसेच नियामक मंडळाचे सदस्य डॉ. सतीश सावंत, श्री. जयप्रकाश सावंत व संचालक श्री. डी.टी देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत व कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, सहयोगी प्रशिक्षक कु. राजकन्या बांगर यांनी केले.

अॅम्पीस्ट इंजीनीअर्स ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांचा फुलस्टॅक डेटासायन्स आणि आर्टीफीशीअल इंटेलीजन्स कोर्स लवकरच सावंतवाडीत सुरु केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 12 वी उत्तीर्ण झालेल्या वि‌द्यार्थ्यांसाठी Full Stack Data Science & Al Certificate Course सुरु करण्यात येणार आहे.

चालू शैक्षणिक वर्षात जे वि‌द्यार्थी बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. अथवा इतर कोणत्याही फील्डमध्ये शिक्षण घेत आहेत, ते वि‌द्यार्थी हा सर्टिफिकेट कोर्स करू शकतात. पुढे येणारे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहे. या कोर्सचा उपयोग भविष्यामध्ये नोकरी व्यवसायामध्ये होणार आहे. सध्याच्या आधुनिक जगात वाढत्या Technology ची गरज लक्षात घेता Data Science & Al हा Course भवितव्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे. आजचा तरुण नोकरीच्या शोधात आहे. त्यासाठी सहज नोकरी मिळून देणारा हा Course आहे. भविष्याल या वाढत्या Technology ला जगभरात मागणी असणार आहे. त्यामुळे Job च्या दृष्टीकोनातून तरुणांसाठी हि एक सुवर्ण संधी आहे. या Course मध्ये विद्यार्थ्याला Company Based लागणाऱ्या Skills शिकवल्या जातील, असेही युवराज लखमराजे भोंसले यांनी स्पष्ट केले.

जसे की :-

Python (Programming Language, Coding), SQL-NOSql Database (Query Language), Power Bl, Tableau Data Visualization Tools, Advanced Excel, Statistics, Machine Learning (ML), Deep Learning, Prompt Engineering आदी.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles