कुडाळ : श्रावणी सोमवार निमित्त श्री रामेश्वर मंदिर आकेरी येथे दिनांक 12 ऑगस्ट व 13 ऑगस्ट 2024 रोजी हुमरस ग्रामस्थ आयोजित जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धा संपन्न झाल्या. यात श्री देवी भराडी प्रासादिक महिला भजन मंडळ मसदे मालवण संघाने प्रथम क्रमांक मिळवत रसिकांची मने जिंकली. तर द्वितीय क्रमांक श्री सिद्धिविनायक महिला भजन मंडळ, कोलगाव यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण स्वप्निल गोरे व आनंद मोर्ये यांनी केले. यावेळी आकेरी सरपंच महेश जामदार, हुमरस सरपंच सीताराम तेली, देवस्थान समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण राऊळ, सर्व देवस्थान समितीचे सदस्य, गावकर मंडळी, पोलीस पाटील सुरेश चव्हाण तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक : श्री देवी भराडी प्रासादिक महिला भजन मंडळ मसदे मालवण.
द्वितीय क्रमांक : श्री सिद्धिविनायक महिला भजन मंडळ कोलगाव
तृतीय क्रमांक : श्री दिर्बादेवी प्रासादिक महिला भजन मंडळ आकेरी
उत्तेजनार्थ : श्री देव ब्राम्हण प्रासादिक महिला भजन मंडळ पावशी
उत्कृष्ठ गायक : बुवा आकांक्षा राणे बाल गोपाल प्रासादिक महिला भजन मंडळ हरकुळ कणकवली
उत्कृष्ठ पखवाज : बुवा साक्षी सुद्रिक श्री भावईदेवी प्रासादिक महिला भजन मंडळ गोठोस
उत्कृष्ठ तबला : बुवा दीपक मेस्त्री श्री देवी भराडी प्रासादिक महिला भजन मंडळ मसदे मालवण.
उत्कृष्ठ झांज वादक :- सिया सुद्रिक श्री भावईदेवी प्रासादिक महिला भजन मंडळ गोठोस
उत्कृष्ठ कोरस : श्री देवी भराडी प्रासादिक महिला भजन मंडळ मसदे मालवण.