केरीत ८ फेब्रुवारी रोजी पं. पलूस्कर संगीत संमेलन.!

हरमल : केरी तेरेखोल परिसर विकास, कल्याण आणि शिक्षण संस्था संचालित अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रामार्फत शनिवार दि. ८ फेब्रुवारी, २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता ” पं. पलूस्कर संगीत संमेलन” आयोजित करण्यात आले आहे.

केरी – पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सभागृहात हे संमेलन होणार असून उदघाटन प्रसंगी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अखिल विश्व गांधर्व परीक्षा प्रमुख पं. रामराव नायक, गोमंतकाचे प्रथितयश चित्रकार, वक्ते संजय हरमलकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे केरी पेडणे, गोवा येथे वर्ष २००७ पासून अधिकृत परीक्षा केंद्र सुरु आहे. मागील १८ वर्षात गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हजारो विद्यार्थी केंद्रातून यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण होऊन ते संगीत क्षेत्रात उल्लेखनीय छाप उमटवीत आहेत. वर्ष २०२४ पासून केरी परीक्षा केंद्राला संगीत विशारद पदवी परीक्षा घेण्याची मान्यता मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रातर्फे बाल संगीत संमेलन, सांगितिक कार्यक्रम, दर्जेदार संगीत नाटके सादर करण्याची प्रथा आहे.

त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी गांधर्व महाविद्यालयाच्या केरी केंद्राचे माजी गुणवंत संगीत विद्यार्थ्यांचा सहभाग असेलेले *पं. पलूस्कर संगीत संमेलन* होत आहे. त्यास सर्व संगीत प्रेमी, हितचिंतकानी आवर्जून उपस्थिती दर्शवावी असे आवाहन केरी तेरेखोल परिसर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्रजेश केरकर, संगीत महाविद्यालय व्यवस्थापक आनंद शिरगांवकर,मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर व शिक्षण व्यवस्थापन समितीने केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles