Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

भोसले फार्मसीचे ‘युफोरिया २०२५’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ डी. फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती सरोज देसाई यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण पार पडले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये फॅशन शो, पारंपरिक गाणी, ऑर्केस्ट्रा, सोलो डान्स, ग्रुप डान्स, एकांकिका इत्यादी कला सादर केल्या केल्या. टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांना जोरदार दाद दिली. कार्यक्रमासाठी आयोजित ध्वनी व प्रकाश योजना सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कमिटी मेंबर्स आणि फार्मसी कॉलेजच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles