दोडामार्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ, कोकण बोर्ड होणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि. 11 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे.न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.काॅलेज भेडशी ता.दोडामार्ग केंद्रावर सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती केंद्रसंचालक मा.नंदकुमार नाईक सर यांनी दिली. या परीक्षेसाठी दोडामार्ग तालूक्यातील एकूण 273 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसाठी 24 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.
परीक्षेचे केंद्र न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज भेडशी हे आहे.या केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. केंद्र संचालक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज भेडशीचे प्राचार्य नंदकुमार नाईक सर, उपकेंद्र संचालक म्हणून अमित कर्पे सर काम पाहत आहेत
ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते दि.11मार्चपर्यंत होणार आहे.परीक्षा कॉपीमुक्त राहणेसाठी कोकण विभागाने भरारी पथके नेमली आहेत. त्यासह प्रत्येक जिल्हा प्रशासनाची भरारी पथके असणार आहेत. त्यासह दक्षता पथकेदेखील गोपनीय पद्धतीने कार्यरत असतील.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल बंदी आहे. तसेच केंद्रांवरील सर्व पर्यवेक्षकांनाही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपले मोबाईल केंद्र संचालक यांच्याकडे जमा करायचे आहेत. पर्यवेक्षकांना परीक्षा कालावधीत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी केंद्र संचालकांचे नंबर पर्यवेक्षकांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांनी तो घरामध्ये देण्याचा आहे. गरज पडल्यास केंद्र संचालकांना संपर्क साधावयाचा आहे.
परीक्षार्थींनी अर्धा तास आधी यावे…परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पेपरपूर्वी अर्धा तास हजर होणे आवश्यक आहे. अकरा वाजता पेपर असलेल्या परीक्षार्थींना साडेदहा वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. १०.४० वाजता उत्तरपत्रिका आणि ११.०० वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.अकरा वाजताच लिहिण्याची परवानगी दिली जाईल. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ताणतणावविरहित परीक्षा द्यावी. परीक्षेबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांशी चर्चा करावी, असे आवाहन केले आहे..
👉विद्यार्थ्यांना लिखाणासाठी १० मिनिटे ज्यादा वेळ.
बोर्डाने विद्यार्थ्यांना १० मिनिटे वेळ वाढवून दिला असून सकाळ सत्रातील पेपर ११:०० ते २:१० पर्यंत असेल तर दुपारचा पेपर ३:०० ते ६:१० पर्यंत असेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची ही परीक्षा गैरप्रकार व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी मंडळाने नियमावलीत काही बदल केले आहे. त्यानुसार यंदाची परीक्षा पार पडणार आहे.
ADVT –