सावंतवाडी :
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे भाजपाचे प्रवक्ते सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस सोमवारी १९ ऑगस्टला माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. सावंतवाडीतील अतिशय शांत, संयमी आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होणार आहे.
यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणाऱ्या या अभिष्टचिंतन सोहळ्यास संजू परब प्रेमी आणि हितचिंतकानी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संजू परब मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.