कुडाळ : किशीनचंद चेल्लाराम लॉ कॉलेज मुंबई या महाविद्यालयाकडून आयोजित केलेल्या ‘लेजीस सेंट्रम लॉ फेस्ट’ मधील कन्ट्री वाईड नॅशनल लेव्हल मेडिएशन स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ च्या टीमने प्रथम क्रमांक मिळवला. सदर टीममध्ये लॉ कॉलेजचे सहिष्णू पंडित, एडवर्ड पिंटो, प्रतीक सावंत सहभागी झाले. या टीमला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. मोडक आणि मा. श्री. जैन यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
याच स्पर्धत ‘बेस्ट मेडियेटर’ म्हणून सहिष्णू पंडित ला विशेष पुरस्काराने सन्मानित केले गेले. या स्पर्धेत देशातील अनेक नामवंत लाॅ काॅलेज टीम्स सहभागी झाल्या होत्या.
या लॉ फेस्टमधील लेटर टू चिफ जस्टीस या स्पर्धेसाठी लॉ कॉलेज कुडाळच्या एडवर्ड पिंटो आणि प्रतिक सावंत यांनी सहभाग नोंदवला तर क्लायंट काउनसेलिंग स्पर्धेत एडवर्ड पिंटो व हिताक्षी तारी यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना कॉलेज च्या प्रा. शांभवी तेंडोलकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
के सी कॉलेज मुंबई आजपर्यंत आयोजित केलेल्या सर्व स्पर्धामध्ये विजेतेपद पटकवणारे कोकण विभागातील पहिले लॉ कॉलेज बनण्याचा बहुमान व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजला मिळाल्यामुळे सर्व स्तरातून व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचे अभिनंदन करण्यात येत आहे.