कणकवली : इयत्ता दहावी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा येथील विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली (८६०२) या केंद्रावर २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. या केंद्रावर बैठक क्रमांक B०२४७३२ ते BO२४९०२ (मराठी माध्यम) व BO२४९०३ ते B0२४९९७(इंग्रजी माध्यम) या क्रमांकाच्या एकूण २६६ विद्यार्थ्यांची परीक्षा बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षा काळात सर्व विद्यार्थ्यांनी पेपर सुरू होण्यापूर्वी (४५ मिनिटे) पाऊण तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर रहावे असे आवाहन (८६०२)विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली केंद्राचे केंद्रसंचालक श्री. पी.जे.कांबळे यांनी केले आहे.
ADVT –
आंगणेवाडी व नेरूर जत्रौत्सवात धमाका..