कोकण मराठी साहित्य परिषद संमेलनात पुस्तकांचे प्रकाशन करण्यासाठी पुस्तके जमा करावीत.!

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन येत्या २२ मार्च रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहेत. लेखकांनी पुस्तके जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दरवर्षी जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकांच प्रकाशन केले जाते. यंदाही कोमसापच्या आजीव सदस्यांसाठी ही सुवर्णसंधी असून पुस्तक प्रकाशन करू इच्छिणाऱ्या सदस्यांनी सावंतवाडी शाखेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी केले आहे.

कोमसापच्या आजीव सदस्यांसाठी ही सुवर्णसंधी असून आपली किमान पाच पुस्तके भरत गावडे व अभिमन्यू लोंढे यांच्याकडे १६ मार्च पर्यंत जमा करावीत असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. दरवर्षी जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकांच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रकाशन केले जाते,असे त्यांनी सांगितले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles