कणकवलीच्या विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत ‘जागतिक चिमणी दिन’ उत्साहात साजरा.

कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा पर्यावरण विभाग आणि सामाजिक वनिकरण कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रशालेतील विद्यार्थ्यासाठी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला पर्यावरण विभाग प्रमुख श्री प्रसाद राणे सर यांनी निसर्गातील चिमणी पक्षी यांचा नामशेष का होत आहे या विषयी पर्यावरण आणि निसर्ग यांचे संतुलन कसे बिघडत चालले आहे तसेच निसर्ग आणि सुक्ष्म जिवजंतू व पक्षी प्राणी यांची निसर्गाला असलेली गरज आणि महत्व या विषयी माहिती सांगून चिमणी पक्षी वाचविण्या साठी विद्यार्थासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले.

वाढते शहरीकरण औद्योगीकरण कारखानदारी वाढती लोकसंख्या उंच इमरती उंच टॉवर त्यामुळे हिरवळ आणि पाणी तसेच निसर्ग निर्मित चिमणी पक्षांचा चारा दुर्मिळ होत आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करून झाडे जगवली पाहिजे आपल्या घराच्या परिसरात छोटी छोटी पाण्याची मडकी ठेवून पाण्याची सोय करावी घरटी तयार करून चिमणी पक्षी वाचविण्याचा प्रयत्न करावा तरच या पक्षांचे संरक्षण होवू शकते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी निसर्गातील पक्षांचे मानवी जीवनातील स्थान स्पष्ट करून चिमणी पक्षांचे संरक्षण करून त्यांची वृद्धी कसी करावी या विषयी मार्गदर्शन करून डॉ सलीम अली पक्षी शास्त्रज्ञ यांच्या पक्षी छंदाची माहिती सांगून चिमणी पक्षांची जपणूक करून निसर्ग व पर्यावरण यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले सामाजिक वनिकरण विभाग कणकवलीचे प्रमुख अधिकारी श्री अनिल पाटील सरांनी जागतिक चिमणी दिनांच्या शुभेच्छा दिल्या यावेळी इंग्रजी विषयाचा अध्यापिका सौ वैभवी हरमलकर मॅडम उपस्थित होत्या प्रशालेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार श्री. राणे सरांनी मानले.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles