रायगड : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातून वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अक्षरा शुभम पवार असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ती शहरातील गोकुळधाम सोसायटीच्या मागे राहत होती.
१२ एप्रिल रोजी सकाळी नोकरी बघायला जाते असे सांगून ती घरातून निघून गेली. मात्र ती अद्यापपर्यंत घरी परतली नाही. अक्षरा बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती शुभम विकास पवार याने पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. डाव्या हातावर मुलाचा फोटो गोंदवलेला असल्याचे पोलिसांनी या मिसिंग तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
ADVT –
📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


