भोसले इंटरनॅशनल स्कूलचा अजून एक माईलस्टोन !, सलग चौथ्या वर्षी १०० % निकाल ; गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम.

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १००% लागला असून शाळेने सलग चौथ्या वर्षी उत्कृष्टतेची परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, २६ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड आणि २ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेडमध्ये यश संपादन केले.

विशेष बाब म्हणजे इंग्लिश माध्यमाच्या या शाळेत दोन विद्यार्थ्यांनी मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली. या उज्वल यशाबद्दल शाळेचे संस्थापक अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, तसेच मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

ADVT –

खुशखबर ! – आता इंजिनिअरिंग व फार्मसी शिक्षणाची चिंता सोडा ! ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे येथे प्रवेश घ्या आणि उत्तम करिअर घडवा !

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles