त्रालमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा ! ; दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक.

पुलवामा : पुलवामाच्या त्रालमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. भारतीय सुरक्षादलाकडून त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी देखील शोपियानमध्ये अशाच एका सर्च ऑपरेशनमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेलं होतं. ऑपरेशन केलर राबवून लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला होता.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाकडून जम्मू – काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. यात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. २ दिवसांपूर्वी शोपियानमध्ये ऑपरेशन सिंदूरअंतर्गत ऑपरेशन केलर राबवून लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आज भारतीय सुरक्षा दलाकडून पुलवामाच्या त्राल परिसरात आणखी २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाल्याचं बघायला मिळालं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles