वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच पदी ठाकरे सेनेचे बाळू गावडे विजयी ! ; शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव ; विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले अभिनंदन !

सावंतवाडी : वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू गावडे यांनी शिंदे गटाच्या राजन आंबेकर यांचा ५ विरुद्ध तीन मतांनी पराभव केला. वेत्ये ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका स्वाती कदम यांच्या उपस्थितीत आज उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांचा ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, सरपंच गुणाजी गावडे, विभाग प्रमुख सुनील गावडे, उपतालुकाप्रमुख अशोक धुरी, शितल खांबल, शेखर खांबल, विजय गावडे संदीप गावडे विश्वास गावडे सचिन गावडे संतोष गावडे शरद जाधव, आर्यन राऊळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles