फार्मसी प्रवेश प्रक्रियेवर ३१ मे रोजी मोफत मार्गदर्शन सत्र.! ; भोसले फार्मसी कॉलेजचे आयोजन.

सावंतवाडी : यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या वतीने शनिवार, दि. ३१ मे रोजी सकाळी १० वाजता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रमावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, आवश्यक कागदपत्रे, शासकीय शिष्यवृत्ती तसेच करिअर संधी याविषयी माहिती मिळावी या हेतूने या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हे सत्र महत्वाचे असून यावेळी भोसले फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप मार्गदर्शन करणार आहेत. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी ते भोसले नॉलेज सिटीपर्यंतची वाहतूक व्यवस्था कॉलेजतर्फे करण्यात आली आहे. सत्र पूर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

कृपया नाव नोंदणीसाठी ८२७५६५१७०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

ADVT –

 

खुशखबर ! – आता इंजिनिअरिंग व फार्मसी शिक्षणाची चिंता सोडा ! ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे येथे प्रवेश घ्या आणि उत्तम करिअर घडवा !

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles