हृदयद्रावक ! – मुलाच्या निधनाच्या धक्क्याने बापानेही सोडला जीव. ! ; सावंतवाडीतील संभया कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर.

सावंतवाडी : काल दिनांक 3 जून रोजी माडखोल धरणात सेल्फी काढताना क्रिश संभया (वय वर्ष 18) याचा बुडून दुर्दैवी मृत्यूची घटना ऐकून हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने आज बापानेही जीव गमावला. सावंतवाडी शहरामध्ये एक दुर्दैव घटना घडली आहे. क्रिश संभया (वय वर्ष 18) हा मुलगा काल संध्याकाळी माडखोल धरणामध्ये सेल्फी काढताना बुडून मृत्यू पावला. ही बातमी समजतात त्याचे वडील सेव्हिओ संभया (वय 48) यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला कारण तो त्यांचा आवडता मुलगा होता आणि त्याच धक्क्याने आज सकाळी त्यांना हृदयाचा तीव्र झटका आला त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू यांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सकाळी सहा वाजता तातडीने दाखल केले. त्याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी तातडीने आरोग्य यंत्रणे हलवली असता ऑन कॉल तत्वावर ड्युटी बजावत असलेले डॉ.अभिजीत चितारी काही मिनिटातच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले व सर्व पद्धतीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु उपचाराच्या दरम्यानच त्यांच आज दुपारी बारा वाजता येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ही वार्ता ऐकताच त्यांचा परिवार, मित्रमंडळी व सावंतवाडी शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles