सांगलीतील बुद्धिबळ स्पर्धेत चमकले ‘मुक्ताईचे स्टार्स’ ! ; बाळकृष्ण, विभव, मयुरेश, यथार्थ, पुष्कर यांची उल्लेखनीय कामगिरी!

सांगली : येथील नूतन बुद्धिबळ मंडळाने ‘कै. बाबुकाका शिरगावकर आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे’ आयोजन केले होते. या स्पर्धेत दोनशे सव्वीस खेळाडूंनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडेमीचे बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ, मयुरेश परुळेकर, यथार्थ डांगी, पुष्कर केळूसकर, चिदानंद रेडकर, हर्ष राऊळ, पार्थ गावकर, विराज दळवी, यश सावंत, गार्गी सावंत, मानस सावंत या बारा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
जिल्ह्यातील आघाडीचा राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर आणि चौदा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू विभव राऊळ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून स्पर्धेत अनुक्रमे अठरावा आणि चोवीसावा क्रमांक पटकावला. बाळकृष्ण आणि विभवने नऊ राऊंडमध्ये प्रत्येकी सहा गुण केले. ॲकेडेमीचा पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मालवण येथील एकोणीस वर्षीय राष्ट्रीय खेळाडू मयुुरेेश परुळेकर याने पाच गुण करुन गटात द्वितीय क्रमांक पटकावला. चौदा वर्षीय राष्ट्रीय खेळाडू यथार्थ डांगी याने पाच गुण करुन तेरा वर्षाखालील गटात चौथा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे ॲकेडेमीचा तेरा वर्षीय विदयार्थी पुष्कर केळूसकर याने दुस-याच रॅपिड रेटिंग स्पर्धेत सहभाग घेऊन आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले. त्याने दोन रेटेड खेळाडूंना हरवून आणि एक रेटेड खेळाडूसोबत बरोबरी करुन साडेचार गुणांची कमाई केली.

मुक्ताई ॲकेडेमीचे अध्यक्ष व प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांच्या मार्गदर्शनखाली या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. युवराज लखमराजे भोंसले यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच ॲकेडेमीचे सर्व विद्यार्थी आणि कौस्तुभ पेडणेकर सरांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles