मिलाग्रीस प्रशालेमध्ये दोन ओरिएंटेशन प्रशिक्षणे यशस्वीरित्या संपन्न.

सावंतवाडी : शहरातील मिलाग्रीस हायस्कूल प्रशालेत दोन ओरिएंटेशन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. पहिले प्रशिक्षण हे प्रशालेतील पूर्व प्राथमिक ते इयत्ता सहावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी होते. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून अँथोनी डिसोजा यांनी काम पाहिले. अँथोनी डिसोजा हे सेंट फ्रँसिस झेवियर स्कूल, कोल्हापूर येथे गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम नेहमीच करत असतात.सदर प्रशिक्षणात कृतीयुक्त अध्यापन, शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र इत्यादी घटकांवर प्रशालेतील शिक्षकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच शुक्रवार, दिनांक 13 जून रोजी प्रशालेत द्वितीय प्रशिक्षण पार पडले. सदर सेमिनारसाठी रेव्ह. फादर डॉ. आयवन अल्मेडा हे प्रशिक्षक म्हणून लाभले होते. पेशाने प्रोफेसर, थेरपीस्ट आणि मेडिटेशन गाईड असणारे फादर आयवन अल्मेडा यांनी तब्बल आठ विषयांमध्ये डिग्री संपादन केलेली आहे. तर तब्बल बारा विषयांचे त्यांनी सर्टिफाइड कोर्स देखील पूर्ण केलेले आहेत. मानवी मनाच्या अवस्था, विद्यार्थ्यांच्या भावावस्था, शिक्षकांचे मानसिक स्थैर्य, अध्ययन अध्यापनाचे सुयोग्य नियोजन अशा विविध घटकांबाबत शिक्षकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
सदर प्रशिक्षणाची संकल्पना ही मिलाग्रीस प्रशालेचे मुख्याध्यापक रेव्ह. फादर रिचर्ड सालदान्हा यांची होती. तसेच पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles