कसाल : भाजपा युवा नेते संदीप गावडे व भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिव्यांग बांधवांच्या मुलांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग आघाडीतर्फे दिव्यांग लोकांसाठी अनेक कार्यक्रम राबविले जात असतात. सर्वांशी संदीप गावडे यांचा परिचय व्हावा, याकरिता मी संदीपला या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलावून घेतले. संदीप हा नुसता दिखाव्यासाठी काम करणार कार्यकर्ता नसून खरोखर समाजासाठी कार्य करणारा कार्यकर्ता आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, युवा नेते संदीप गावडे, संध्या तेरसे, भाजप दिव्यांग आघाडी संयोजक अनिल शिंगाडे, तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.
संदीप गावडे व भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने वह्या वाटप. ; निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


