संजू परबांवर बोलण्यापेक्षा महेश सारंग यांनी आत्मपरीक्षण करावे ! – क्लॅटस फर्नांडिस.

सावंतवाडी : आमचे नेते संजू परब हे जनतेतून निवडून येऊन नगराध्यक्ष झाले आहेत. मागील निवडणूकीत संजू परब यांनी 9 पैकी तब्बल 5 जिल्हा परिषद निवडून आणल्या आहेत. मात्र त्यावेळी महेश सारंग देखील भाजपात होते. मात्र त्यांनी केवळ एकचं बांदाची सीट निवडून आणली. पंचायत समितीच्या निवडणूकीतही त्यांचे केवळ दोनच सदस्य निवडून आले होते. स्वतः त्यांच्या कोलगाव जिल्हा परिषद गटात त्यांचा दारुण पराभव झाला आणि पंचायत समितीत त्यांची सीट पडली होती, हा इतिहास आहे. त्यामुळे संजू परब यांच्यावर बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आमच्या नेत्यावर विनाकारण बोलू नये, असा टोला युवा शिवसैनिक क्लॅटस फर्नांडिस यांनी लागवला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles