भाजपाच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप! ; युवा नेते संदीप गावडे यांचा स्तुत्य उपक्रम.

दोडामार्ग : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भजनी मंडळांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्याच्या हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील युवा नेते संदीप गावडे यांच्यामार्फत भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील एकूण ३५ मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, दोडामार्ग शहर अध्यक्ष राजेंद्र फुलारी, उप तालुकाध्यक्ष आनंद तळणकर साहेब, देवाजी शेटकर आदी मान्यवर तसेच दोडामार्ग तालुक्यातील सर्व भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles