- रुपेश पाटील
सावंतवाडी : तालुक्यातील आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात सातत्याने जनतेच्या सेवेसाठी कार्य करणारे, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उपक्रमातून जनसेवेचा ध्यास घेतलेले युवा नेते व माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जाणारे यशस्वी उद्योजक दिनेश गावडे यांची नुकतीच शिवसेना शिंदे गटाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
युवा नेते दिनेश गावडे यांची ही निवड म्हणजे जनसेवेचा ध्यास घेतलेल्या झपाटलेल्या युवकाला मिळालेली एक प्रकारे कार्याची पावती आहे, अशी जनमानसातून चर्चा रंगू लागली आहे. आज खऱ्या अर्थाने दिनेश गावडेसारखा जनमानसात मिसळणारा युवा नेत्याच्या खांद्यावर सामाजिक कार्य करत असताना शिवसेनेसारख्या जनतेच्या न्याय हक्कांसाठी झटणाऱ्या पक्षाची जबाबदारी महत्त्वाची जबाबदारी दिली गेल्यामुळे आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
दरम्यान, आपण जनसेवेचे व्रत घेऊन सातत्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणार असल्याचे दिनेश गावडे यांनी सांगितले. दिनेश गावडे यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


