कोमसापची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० सप्टेंबर रोजी कुडाळमध्ये!

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा केंद्रीय अध्यक्षा मान.नमिता रमेश कीर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे सकाळी ११.४५ वा. कुडाळ हायस्कूल नजीकच्या मराठा मंडळ सभागृहात होणार आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेला उपस्थित रहावे अशी विनंती केंद्रीय कार्यवाह श्री माधव अंकलगे व केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांनी केली आहे.

या सभेमध्ये २०२४- २५ च्या खर्चाची माहिती देणे व मंजुरी घेणे, २०२५- २६ च्या अंदाजपत्रकास तसेच सनदी लेखापाल नियुक्तीला मंजुरी देणे, कार्यकारिणीने सुचविलेल्या घटना दुरुस्तीस मान्यता देणे, नवनिर्वाचित केंद्रीय कार्यकारिणी (२०२५- २८) ला कार्यकारिणीने निवड केलेले अध्यक्ष यांना मान्यता देणे, नवनिर्वाचित केंद्रीय अध्यक्षांनी केंद्रीय कार्यकारिणी निवड व सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आदी महत्त्वाचे विषय चर्चिले तसेच मंजूर केले जाणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles