सावंतवाडी : उद्या दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग यांच्या मार्फत श्री. संजय लाड (जिल्हा अध्यक्ष वीज ग्राहक संघटना) व ॲड. श्री. नंदन वेंगुर्लेकर ( जिल्हा समन्वयक) यांच्या नेतृत्वात नूतन जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वीज ग्राहक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त्त वीज ग्राहकांनी तसेच जिल्हा/तालुका पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष
संजय लाड यांनी केले आहे.
उद्या १० सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना घेणार नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट! ; वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत वेधणार लक्ष!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


