क्लेटस फर्नांडिस यांची युवा सेनेच्या सावंतवाडी तालुका प्रमुखपदी स्तुत्य निवड!

सावंतवाडी : युवा सेनेच्या तालुका प्रमुखपदी क्लेटस फर्नांडिस यांची आज निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हर्षद ढेरे यांच्या माध्यमातून ही निवड करण्यात आली असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष बबन राणे, झेवियर फर्नांडिस, प्रेमानंद देसाई, गजानन नाटेकर, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत यांसह अन्य उपस्थित होते.

युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक बांदेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे गेले दोन महिने हे पद रिक्त होते. त्या ठिकाणी श्री. फर्नांडिस यांना संधी देण्यात आली आहे. फर्नांडिस हे आमदार निलेश राणे व संजू परब यांचे विश्वासू सहकारी असून ग्रामीण भागातही त्यांचे काम आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्ष संघटना व युवक संघटना वाढवण्यासाठी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles