Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आता रोज शिवसेनेत प्रवेश होणार अन् भगवा फडकणार! ; संजू परब यांचा नाद खुळा, मळेवाड उबाठाच्या हाती दिला खुळखुळा!

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा उबाठाला धक्का दिला आहे. मळेवाडमध्ये मोठं खिंडार त्यांनी पाडलं असून आता रोज प्रवेश होणार, भगवा फडकणार असा विश्वास श्री. परब यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश घेण्यात आला. यामध्ये मळेवाड सोसायटी चेअरमन प्रकाश पार्सेकर, व्हा. चेअरमन प्रकाश राऊत, संचालक गोविंद मुळीक, गोपिका रेडकर, अर्जून तेली, धाकू शेळके, देऊ शिरसाट, रविंद्र तळवणेकर, दाजी पार्सेकर, दाजी गावडे, एकनाथ गावडे, दत्ताराम मुळीक, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सतिश नाईक, विभागप्रमुख दाजी रेडकर, महिला उप तालुकाप्रमुख साधना कळंगुटकर, ग्रा. प. सदस्य अर्जून मुळीक आदींसह शेकडो जणांनी जाहीर प्रवेश केला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, आता रोज प्रवेश होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतवर भगवा फडकवायचा आहे‌. मी तुमच्या पाठीशी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना नेते, अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, परिक्षीत मांजरेकर, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, गजानन नाटेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles