दाणोली येथील वाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन! ; कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांची लाभणार विशेष उपस्थिती.

सावंतवाडी : तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर येथे 15 ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिना’चे औचित्य साधत वाचनालयाच्या वतीने ‘ग्रंथ प्रदर्शन’, ‘मी वाचलेले पुस्तक’, ‘वाचू आनंदे’ हे उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे यांनी दिली आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष, कवी दीपक पटेकर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान यावेळी ग्रंथ प्रेमी श्री. आवळे यांनी वाचनालयासाठी स्नेह भेट म्हणून दिलेले मारुती चितमपल्ली व जयंत नारळीकर या दोन लेखकांच्या सुमारे पाच हजार रुपये किमतीच्या पुस्तकांचे ‘ग्रंथ प्रदर्शन’ देखील लावण्यात येणार आहे.
याचे उद्घाटन कवी दीपक पटेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तसेच ‘तुम्ही वाचा मुले वाचतील!’ हा अभिनव उपक्रम देखील यावेळी संपन्न होणार आहे. सोबतच दाणोली व माडखोल केंद्रात नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत वाचनालयाच्या वतीने ग्रंथ देऊन करण्यात येणार असून हा कार्यक्रम बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता साटम महाराज वाचन मंदिर, दाणोली येथे संपन्न होणार असल्याचे अध्यक्ष भरत गावडे यांनी कळविले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles