अभिमानास्पद ! – भक्ती गांवस – तावडे यांना जे. जे. टी. विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त.

सावंतवाडी: सौ. भक्ती प्रसाद गांवस – तावडे यांना  जे. जे. टी. विद्यापीठ राजस्थान यांची ‘डॉक्टर ऑफ फिलोसॉफी’ ( पी. एचडी. ) ही पदवी प्राप्त झाली आहे. भक्ती गांवस हिने श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबडेवाला विश्वविद्यालय विद्यानगरी, झुंझुनू राजस्थान येथे ‘लायब्ररी ऑफ सायन्स’ या विषयात ” बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड ( तृतीय ) का पुस्तकालय मे विशेष योगदान ” हा हिंदी प्रबंध सादर केला होता. या प्रबंधामध्ये बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात शिक्षण व ज्ञान प्रसारण याकरिता ग्रंथालयाचे जाळे सक्षमपणे उभे करून प्रजाभिमुख राजकारभार केला. महाराजांच्या या कार्याचे त्या काळात जगभर कौतुक झाले. महाराजांच्या या सर्व कार्याचा आढावा या प्रबंधामध्ये चिकित्सकपणे सौ. गांवस यांनी घेतला आहे. या प्रबंधाला मान्यता देऊन विद्यापीठाने भक्ती गांवस हिला ‘डॉक्टर ऑफ फिलोसॉफी’ पदवी प्रदान केली. या प्रबंधासाठी तिला प्रो. अमजत अली व डॉ. जी. ए. बुवा यांचे मार्गदर्शन लाभले.

या प्रबंधासाठी ज्येष्ठ साहित्यिक श्री. बाबा भांड व डॉ. रमेश वरखेडे, गोवा सेंट्रल लायब्ररीचे माजी क्यूरेटर डॉ. सुशांत तांडेल यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे सौ. भक्ती गांवस यांनी सांगितले.
यापूर्वी सौ.भक्ती गांवस यांनी प्रगती महिला अध्यापक महाविद्यालय, तोरसे, गोवा येथे ग्रंथपाल म्हणून काम केले आहे. वासूदेवानंद सरस्वती महाविद्यालय, माणगाव येथे हि तीने दोन वर्ष ग्रंथपाल म्हणून काम केले होते. श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रंथालय आणि माहिती शास्त्र पदवी आणि पदवीत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी गेली पंधरा वर्षे त्या मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अनेकांनी तीचे अभिनंदन केले आहे.

भक्ती ह्या ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे यांच्या सुकन्या आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles