‘रोटरी’ क्लच्या माध्यमातून व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांना देऊ उभारी! रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे. ;

सावंतवाडी : संपूर्ण जगभरात कार्यरत असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून आमच्या रोटरी परिवारातर्फे आगामी काळात त्यांच्या उपक्रमांना उभारी देण्याचं कार्य करू. जेथे जेथे शक्य होईल तेथे तेथे रोटरी क्लबच्या माध्यमातून व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग देऊ, असं प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी व्यक्त केले.

 

सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या’ माध्यमातून पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ॲड. भांबुरे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे उपक्रमशील अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे तसेच कोकण व कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रतिनिधी प्रथमेश सावंत आदि उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अतिथींचे स्वागत व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग टीमच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.

दरम्यान यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक सच्चिदानंद उर्फ संजू परब पुढे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांना खऱ्या अर्थाने एखादी बातमी करत असताना ज्या ज्या प्रवासातून जावे लागते ते मी माझ्या राजकीयआणि सामाजिक जीवनात अनुभवत आहे. मात्र हे सगळे करत असताना व्हॉईस ऑफ मीडियाने आपला एक स्वतःचा दर्जा कायम राखला याबद्दल संघटनेचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक संजू परब, अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष आणि युवा नेते विक्रांत सावंत, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

गुणवंतांचा विशेष सन्मान!

सदर कार्यक्रमात नुकताच विद्यावाचस्पती अर्थातच पीएचडी मिळविलेल्या डॉ. भक्ती गांवस – तावडे, रील स्टार साईश सीताराम गावडे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सौ. चैताली नयनेश गावडे आणि दहावी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या रेश्मा संदेश पालव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन युवा आदर्श पत्रकार विनायक गांवस यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन संघटनेचे कार्याध्यक्ष भूषण सावंत यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव शैलेश मयेकर, सहसचिव संजय पिळणकर, कार्याध्यक्ष आनंद धोंड व भूषण सावंत, उपाध्यक्ष अमित पालव व मिलिंद धुरी, खजिनदार आनंद कांडरकर, प्रसिद्धीप्रमुख दीपक पटेकर, महिला जिल्हाध्यक्षा पूनम राठोड, संघटक समीर म्हाडेश्वर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष आप्पा राणे, सदस्य नयनेश गावडे, शुभम गवस, साबाजी परब, शुभम सावंत, पत्रकार नाना धोंड, अक्षय धुरी, नितीन गावडे यांसह व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles