सावंतवाडी : “कोकण कोकण” या लोकप्रिय गिताचे सुप्रसिध्द गायक प्रणय शेट्ये यांच्या उपस्थितीत आज “रिलोत्सव – २०२५” स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव होणार असून जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे आज सायंकाळी ६:०० वा. हा दिमाखदार समारंभ होणार आहे. तरी सर्वांनी आपली उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांनी केले आहे.



