हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत वयस्कर अभिनेत्रीचं निधन! ; ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन.

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं आहे. कामिनी कौशल या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रमुख अभिनेत्रींपैकी एक होत्या. 1940 ते 1960 च्या दशकात त्यांनी विविध चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दिलीप कुमार आणि देव आनंद यांच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध चर्चेत होते. कामिनी यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. कामिनी यांचं कुटुंब नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचं आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी फिल्म इंडस्ट्रीवर मजबूत छाप सोडली आहे. 1946 ते 1963 पर्यंत त्यांनी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलंय. फिल्म इंडस्ट्रीतील त्या सर्वांत वयस्कर अभिनेत्री होत्या. कामिनी कौशल यांनी सात दशकांपर्यंत इंडस्ट्रीत काम केलं.

1946 मध्ये ‘नीचा नगर’ या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाने पहिल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता. ‘पाम डी’ओर’ जिंकणारा हा एकमेव भारतीय चित्रपट होता. यामुळे एक प्रतिभावान नवोदित कलाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी 1946 ते 1963 या काळात ‘दो भाई’, ‘शहीद’, ‘नदियाँ के पार’, ‘जिद्दी’, ‘शबनम’, ‘पारस’, ‘नमुना’, ‘आरजू’, ‘नमूना’, ‘जेलर’, ‘नाईट क्लब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. अशा गुणी अभिनेत्रीस ‘सत्यार्थ न्यूज’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles