सावंतवाडी : आजपर्यंत सावंतवाडीकरांचे आशीर्वाद आम्हाला राहीले आहेत. ही प्रेमाची लढाई आहे. आमचा विजय निश्चित आहे. निवडणूक निवडणूकीसारखी लढू, लोकांची मन नम्रतेन जिंकू, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
युतीची बोलणी प्रत्यक्ष सुरू नाही. युती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढू, भाजपकडून अद्याप निरोप आलेला नाही. त्यांनी निरोप दिला तर आम्ही बोलणी करू असंही ते म्हणाले. विकासाच्या मुद्यावर आम्ही लढत आहोत. विकास आम्ही केला आहे. जनता आमच्यासह राहील. आमच्या उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहे. उच्चशिक्षित अशा आमच्या उमेदवार वकील संघटनेच्या अध्यक्ष आहेत. लोकांसाठी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या सदैव उपलब्ध असतात. यापुढे त्या लोकसेवा करतील असा विश्वास आहे. आम्ही युतीची तयारी दाखवली होती. भाजपने देखील प्रस्ताव स्वीकारला नाही तर आमचा नाईलाज आहे. तरीही तिसऱ्याचा लाभ होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, ताकदीन निवडणूक लढवू आणि जिंकू



