सावंतवाडी : भाजपकडून आज विविध प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात श्रद्धाrajeसावंतभोंसले यांनी भाजपचा नगराध्यक्षपदाचा नवा चेहरा सावंतवाडीकरांना दिला आहे. यावेळी भाजपाकडून आनंद नेवगी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रतीक बांदेकर मोहिनी मडगावकर यांनी देखील आपले अर्ज आज दाखल केले आहेत. यावेळी सावंतवाडीच्या राणी सरकार शुभदा देवी भोसले, युवराज लखमराजे सावंत भोसले, भाजपचे युवा नेते विशाल परब, सौ. वेदिका परब, संदीप गावडे, शहर अध्यक्ष सुधीर आडिवडेकर, मनोज नाईक आदी होते.



