Tuesday, December 9, 2025

Buy now

spot_img

आमचा विकास आमदारांना करणार आश्चर्यचकित! : सौ. वेदिका परब. ; निकालानंतर गुलाल भाजपचाचं!

सावंतवाडी : अपेक्षा व्यक्त न करता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण माझं नाव घेतात यातच मी खुष आहे. विशाल परब यांच नाव फक्त सावंतवाडी शहरापुरत मर्यादीत नाही. मलाही नगरपरिषदेपुरत मर्यादीत राहायचं नाही. सर्व महिलांना संधी मिळावी, हा माझा हेतू असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणेंच्या शब्दाबाहेर आम्ही नाही, मत सौ. वेदिका परब यांनी व्यक्त केले.

सावंतवाडीचा विकास आम्हाला करायचा आहे. आमचा विकास हा असा असेल की इथल्या आमदारांना देखील विचार करायला लावेल, असा आमचा विकास असेल असा सौ. परब यांनी दावा केला. एक नगरपरिषद काय करू शकते हे दाखवून देऊ. भाजपच्या माध्यमातून हा विकास आम्ही करून दाखवू. महाराष्ट्रापासून देशात भाजपची ताकद आहे. त्यामुळे इथला विकास थांबणार नाही. भाजपचाच गुलाल निकालानंतर दिसेल, असा विश्वास सौ. परब यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles