सावंतवाडी: नुकताच सावंतवाडी मध्ये शिवसंस्कार चा तिसरा वार्षिक सन्मान सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,गुजरात राज्यातील विविध स्पर्धांमधील विजेत्यांना गौरविण्यात आले.यावेळी ज्येष्ठ इतिहासकार श्री. गजानन मेहेंदळे सर यांना चित्रफितीद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व संशोधक, उत्कृष्ठ कार्य करणारे शिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला.
गत वर्षीप्रमाणे यावर्षीही विविध स्पर्धा राबविल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील सर्वात रोमहर्षक प्रसंग म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला अफजलखानाचा वध!दिनांक २७ नोव्हेंबर रोजी असलेली मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी म्हणजेच ‘ शिवप्रतापदिन’ होय. या शिवप्रतापदिना निमित्त खुली चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी वयाची अट नाही.कोणत्याही वयाचा स्पर्धक भाग घेऊ शकतो.
*चित्रकला स्पर्धा*
विषय- किल्ले प्रतापगड( चित्र आपल्या आवडीच्या कोणत्याही रंगात रंगविलेले चालेल. कृपया पेन्सिल स्केच पाठवू नये.)
चित्र A4 साईझ च्या पेपरवर काढलेले असावे. पंधरा सेकंदचे तीन व्हिडिओ चित्र सुरु करताना, मध्ये आणि पूर्ण करताना असे पाठविणे बंधनकारक आहे.
वक्तृत्व स्पर्धा –
विषय – किल्ले प्रतापगड निवड…कारणमीमांसा ( महाराजांनी अफजलखान भेटीसाठी प्रतापगडच का निवडला याचे विश्लेषण असावे.)
वेळ – १० मिनिटे
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्या नंतर आपल्या कर्तबगारीने स्वराज्याची घडी बसविणाऱ्या महाराणी ताराराणी यांची पुण्यतिथी नुकतीच झाली.त्यानिमित्ताने महाराणी ताराराणी वेशभूषा स्पर्धा होणार आहे. स्पर्धा खुली असून वय वर्ष तीन पासून पुढे कोणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.आपला व्हिडिओ अडीच मिनिटांचाच असावा.व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक व लाईट वापरू नयेत.
इतिहासात मोठं कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या परंतु विस्मरणात गेलेल्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाचा परिचय व अभ्यास असे दोन्ही हेतू या स्पर्धेद्वारे साध्य व्हावेत यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
तीनही स्पर्धा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरात या चारही राज्यांसाठी खुली आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकानी सहभागी होऊन इतिहासाचा जागर करावा असे आवाहन शिवसंस्कार तर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेचे चित्र व वेशभूषा व्हिडिओ शिव संस्कार च्या 9607827296 या नंबरवर पाठवावा.तसेच संस्थेच्या या नंबरवर किंवा QR कोड वर रू १००/- एन्ट्री फी पाठवावी. सर्व स्पर्धांची अंतिम तारीख २डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत राहील.



