सावंतवाडी : येथील नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाकडून वार्ड क्रमांक सहा मधून निवडणूक रिंगणात असलेले उदय भोसले यांना जनतेतून वाढता पाठिंबा मिळत आहे. डोअर टू डोअर प्रचार करून उदय भोसले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.



