भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या सावंतवाडीत होणार दाखल! ; पत्रकार परिषदेत काय बोलणार?, संपूर्ण महाराष्ट्राचे लागले आहे लक्ष.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सावंतवाडी येथे उद्या दाखल होत आहेत. भारतीय जनता पार्टी व युवा नेते विशाल परब यांच्या शिरोडा नाका, सावंतवाडी येथील कार्यालयात ते सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, असे भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कळविले आहे.

दरम्यान, सावंतवाडी येथे नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पार्टी व शिंदे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वादानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सावंतवाडीत येत आहेत. या दौऱ्याकडे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय बोलणार?, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles