निकाल काहीही लागो पण आपलं प्रेम अन् स्नेह जन्मोजन्मी मिळो! ; सीमा मठकरांनी मानले जनतेचे हृदयपूर्वक आभार!

सावंतवाडी : येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सीमा मटकर यांनी त्यांना साथ देणाऱ्या जनतेचे तसेच मतदार बंधू भगिनींचे हृदयपूर्वक आभार मानून आपला स्नेह आणि आपुलकी जन्मोजन्मी मिळो, अशी अपेक्षा व्यक्त करत तमाम जनतेचे ऋण व्यक्त केले आहेत.

सौ. सीमा मिलिंद मठकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्या म्हणतात –

” तमाम बंधू-भगिनी यांना माझा सस्नेह नमस्कार!”

”सावंतवाडी नगरपालिका निवडणूक 2025 च्या निवडणूक प्रक्रियेत मला शिवसेनेच्या उबाठा पक्षातून नगराध्यक्षपदी निवडणूक लढविण्याची संधी मिळाली… या पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड करण्यात आली त्या बद्दल पक्षाचे जेष्ठ आणि श्रेष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते.
2 डिसेंबर 2025 रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दरम्यान गेले काही दिवस प्रचार मोहीम सुरु होती या मोहिमेअंतर्गत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी माझ्या प्रचार मोहिमेत ज्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या लाखमोलाचे सहकार्य मला लाभले त्यांचे उपकार आजन्म माझ्या सोबत राहतील. ज्यांना ईच्छा असूनही काही कारणास्तव प्रत्यक्षरित्या माझ्या प्रचारमोहिमेत येणं शक्य नव्हतं त्यांचाही छुपा पाठिंबा माझ्या सोबत होता. इतर पक्षीय काही कारणास्तव म्हणा किंवा सावंतवाडी पासून दूर असणारे असे माझे बरेच निकटवर्तीय ज्यांनी माझ्या निवडणूक प्रचार काळात फोन द्वारे किंवा इतर माध्यमातून मला काही योग्य सल्ले दिले.

माझे काही मित्रवैर्य त्यापैकी एक मित्र बाहेगावाहून आपला कामधंदा बाजूला ठेवून माझ्या प्रचारात माझ्या सोबत ठामपणे पाठीशी राहिले खरोखरचं या मित्रांना पूजनीय देवासमान मानते. ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ ह्या इतिहासातील अधोरेखित वाक्याला सुद्धा माझ्या एका सहकारी मित्राने आपल्या घरचं कार्य सुरु असताना देखील वेळोवेळी माझी दखल घेतली, हे इतकं प्रेम, माया आणि आपुलकी मला या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचारात मिळाली.

सावंतवाडीच्या निवडणुकीच्या अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण भागात प्रचारासाठी मतदारांच्या घरी माझे पदस्पर्श झाले त्या प्रत्येकांच्या घरी बंधूभगिनीं आणि मातपित्या समान असणाऱ्या माझ्या सर्व मतदार बांधवानी माझा आदरपूर्वक सन्मान राखला, थोऱ्या मोठ्यांची माझ्या पाठीवरील कौतुकाची थाप, त्यांचे आशीर्वाद मला त्या ठिकाणी लाभले…. धन्य होऊन मन भरून पावले मी …सावंतवाडी नगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान मला माझ्या मतदारांच प्रेम, आपुलकी आणि माझ्या प्रति तुमची माझ्यावर असलेली निष्ठा पहाता मला असं वाटतय की निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण मी मात्र नगराध्यक्ष झाल्याचा आनंद आधीच उपभोगला….
पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते…सर्वांचे आरोग्य निरोगी, आनंदी राहो ही त्या वाडीच्या श्री. देव पाटेकर आणि श्री. देव उपरलकर चरणी प्रार्थना करते….

आता लक्ष जरी 21 तारखेच्या निकालाकडे असले तरी मला सहकार्य केल्याबद्दल तुम्हां सर्वांचे लाख लाख धन्यवाद..!”
🙏🙏🙏

  • आपलीच हक्काची –

सौ. सीमा मिलिंद मठकर.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles