सावंतवाडी : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महानिर्वाण दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीच्या वतीने उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक पाच रोजी रात्री दहा वाजता भीम गीत गायन कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार असून रात्री बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घाल त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना होणार आहे.
उद्या शनिवारी सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पूजापाठ व धार्मिक विधी तर सायंकाळी चार वाजता अभिवादन सभा होणार आहे. यावेळी विशाल मोहिते (कोल्हापूर) यांचे विशेष मार्गदर्शन होणार असून कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी बुधाजी कांबळी हे राहणार आहेत. तर सायंकाळी 5:30 वाजता भीमा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष दिलीप जाधव व महिला आयोगाचे अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर यांनी केले आहे.


