सावंतवाडी : जागतिक मृदा दिनानिमित्त असनिये येथे कृषी विभागाकडून विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बांदा मंडळाचे कृषी अधिकारी युवराज भुईम्बर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात मृदा आरोग्याचे महत्त्व, मातीची सुपीकता टिकवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेतीचे फायदे, तसेच पीकपद्धतीतील शाश्वत बदल या विषयांवर भुईम्बर यांनी सविस्तर माहिती दिली. माती परीक्षणाचे फायदे, मातीतील कमतरता ओळखून योग्य प्रमाणात खते वापरणे, सूक्ष्मअन्नद्रव्यांचे महत्त्व याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे उपस्थित शेतकऱ्यांना नवीन माहिती, तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत उपयुक्त मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.
कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



