नेमळे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत उत्तुंग यश!

सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाटकर वर्दे कॉलेज आयोजित विविध स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले. पाककला स्पर्धेत अनिशा मयेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. सलील कुडाळकर यांने तृतीय क्रमांक व सानिका राऊळ हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.

तसेच रिल मेकिंग स्पर्धेत सार्थक राऊळ यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर रांगोळी स्पर्धेत भार्गवी मांजरेकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. रिल स्पर्धेत साहिल कुडाळकर यांने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य आर. के. राठोड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना सुषमा कासार मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles