सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे गांवकर कुंभारवाडी येथील ॐ श्री योगेंद्रनाथ महाराज श्री दत्त अनघालक्ष्मी पंचायतन देवस्थानचा चौथा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि16 डिसेंबर 2025 रोजी विविध धार्मिक विधी व क्रार्यक्रमांनी संपन्न होत आहे.
क्रार्यक्रम पत्रिका-
सकाळी 9.oo वा शरीरशुद्धी गणपतीपुजन पुण्याहवचन – देवतापुजन स्थापना
सकाळी 10.OO वा. – वर्धापन होम नऊ व्रतपुजा अनघादत्तलक्ष्मी सत्यदत्त पुजा आणि सात सत्यनारायण पुजा कथापुजन पुर्णाहुती दुपारी 1.00 नंतर आरती व महाप्रसाद रात्री 8 नंतर भजनाचा कार्यक्रम
तरी या संपूर्ण कार्यक्रमांसाठी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या सोहळ्याच्या कृपा प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन योगेंद्र नाथ भक्त सेवा मंडळ, तसेच गणेश निवास श्री सत्यवान सोन्सूरकर नेमळे गावकर कुंभारवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे


