सावंतवाडी : तालुक्यातील तळवणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामचंद्र गावडे यांचा वाढदिवस शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून साजरा केला.

यावेळी ओबीसी जिल्हाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते सुदन कवठणकर, जिल्हा चिरेखाण संघटना सहसचिव प्रवीण बर्वे, संजय पालव, सावंतवाडी चिरेखाण संघटना अध्यक्ष सुशील कामटेकर, प्रकाश राऊत, कमलेश मोठे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



