सांगेलीतील ‘तो’ रस्ता अखेर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केला खुला!

सावंतवाडी  : तालुक्यातील सांगेली नदीपात्रातील अवैध वाळू आणि दगड गोटे उत्खननाची तक्रार जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे केल्याचा राग मनात ठेवून घराकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून अडविल्याचा प्रकार सांगेली येथे घडला होता. सदर रस्ता आठवडाभरानंतर बुधवारी सकाळी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला.रस्ता अडविल्याप्रकरणी जमीन मालक श्रीकांत खोत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

सांगेली येथील नदीपत्रातील वाळू आणि दगडगोटे यांचे अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार राजकुमार राऊळ यांच्यासह श्रीकांत खोत व अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून उपोषण केले होते. त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. या तक्रारीच्या रागातून आठवडाभरापूर्वी खोत यांच्या घर व जमिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डंपर भरून माती ओतून रस्ता बंद करण्याचा प्रकार घडला. सदर रस्ता सार्वजनिक आणि ग्रामपंचायतीच्या २३ नंबरला असल्याची खात्री केल्यानंतर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सदर रस्ता खुला करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, तरीही कार्यवाही न झाल्याने स्वतः तहसीलदारांनी मंडळ अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर रस्ता खुला करून दिला आहे. तहसीलदारांनी तक्रारदार श्रीकांत खोत यांच्याशी चर्चा केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles